समूहजीवनासाठी व्यवस्थापन

सांगा पाहू: रस्त्यावर अपघात का होतात?

views

5:02
सांगा पाहू: रस्त्यावर अपघात का होतात? मुलांनो, आपली शाळा काही मुलांच्या घरांपासून खूप जवळ आहे, तर काहींच्या घरांपासून खूपच लांब आहे. खूप लांब शाळा असणारी मुले रोज चार-पाच किमी अंतर पार करून आपल्या शाळेत येत असतात. अशी मुले किंवा इतरही मुले रस्त्यावरून येता- जाता पाहतात की, रस्त्यावर अनेकदा छोटे-मोठे अपघात होत असतात. रस्त्यावर चालण्याचे, वाहतुकीचे काही नियम असतात. त्यातील काही नियम तुम्हाला माहीत असतील ना? आता माझ्या काही प्रश्नांची उत्तरे द्या. मुलांनो, असेच वाहतुकीचे नियम असतात. तुम्हांला माहीतच असेल की रस्त्यावरून नेहमी डाव्या बाजूने चालावे. वाहनेसुद्धा नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूनेच धावतात. मुलांनो, वाहतुकीचा जर हा नियम नसता आणि आपल्याला हव्या त्या बाजूने आपण गाडी चालविली असती, तर काय झाले असते? तर रस्त्यावर गोंधळ निर्माण झाला असता. वाहने एकमेकांच्या समोर येऊन एकमेकांवर धडकली असती. सर्व रस्त्यावर अपघातच झाले असते. परंतु डाव्या बाजूने गाडी चालवत असल्याने बिनधास्त गाडी चालविणे किंवा रस्त्यावरून चालणे शक्य होते.