समूहजीवनासाठी व्यवस्थापन

सांगा पाहू

views

3:45
शि: मुलांनो, आता ही चित्रे पहा. या चित्रांत तुम्हाला विहिरीवर पाणी भरणाऱ्या स्त्रिया, बागेत खेळणारी मुले, रस्त्यावरील दिवे व शहरातील कचरा गोळा करणारी गाडी यांसारख्या गोष्टी दिसत आहेत. या सर्व गोष्टी कोणा एकाच्या मालकीच्या नसतात. तर त्या सार्वजनिक असतात. तशाच त्या सर्वांसाठी असतात. अशा प्रकारे मुलांनो, आपण कोठेही असो किंवा कोणत्याही समूहात आपण राहत असलो तरी, समूहाचे दैनंदिन व्यवहार व्यवस्थित पार पडण्यासाठी नियमांची तेवढीच गरज असते. आपण काय शिकलो: मुलांनो, आपण या पाठातून पुढील गोष्टी शिकलो: 1) कोणतेही काम करण्यासाठी आणि ते व्यवस्थित पार पाडण्यासाठी व्यवस्थापन खूप महत्त्वाचे असते. 2) जेव्हा आपण एखादे काम वैयक्तिक पातळीवर करतो तेव्हा व्यवस्थापन आवश्यक असतेच, परंतु समूहात काम करताना त्या कामांचा सविस्तर आराखडा तयार करणे आवश्यक असते. 3) सामूहिक काम करताना आपण जो आराखडा बनवितो त्याप्रमाणे काम केले तरच ते सुरळीत व वेळेत पार पडते, गोंधळ निर्माण होत नाही. 4) शाळेतील विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अधिक चांगल्या प्रकारे विकास व्हावा, म्हणजेच त्यांच्यातील सुप्त गुण विकसित व्हावेत, म्हणून शाळा व्यवस्थापन समिती कार्य करते. 5) लोकांना दैनंदिन सेवा-सुविधा पुरविणे व लोकांच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी सोडविण्याचे काम स्थानिक शासन संस्था करते.