वाहतूक व संदेशवहन

माहीत आहे का तुम्हांला

views

3:25
माहीत आहे का तुम्हांला : मुलांनो आधुनिक काळात वाहतुकीची अत्याधुनिक साधने वापरली जात आहेत. उदा. मोटारसायकल, बस, ट्रक, रेल्वे, हेलिकॉप्टर, विमान, जहाज इत्यादी. परंतु अनेक ठिकाणे किंवा प्रदेश असे असतात, की अशा ठिकाणी या अत्याधुनिक वाहतुकीच्या साधनांचा उपयोग होत नाही. उदा. पर्वत, उंच डोंगररांगा, दुर्गम जंगलाचा भाग इत्यादी ठिकाणी या अत्याधुनिक वाहतुकीच्या साधनांचा वापर करता येत नाही. कारण तिथे नीट रस्ते नसतात. अशा भागांत वाहतुकीसाठी आजही माणूस व प्राणी यांचा वापर केला जातो. . उदा. लेहसारख्या थंड व दुर्गम भागात याक या प्राण्याचा वापर केला जातो. तिथल्या थंडीला हे प्राणी सहज तोंड देऊ शकतात. वाळवंटी प्रदेशात वाळूतून वाहतुकीची इतर साधने चालू शकत नाहीत. अशा ठिकाणी उंट या प्राण्याचा वापर करतात. बर्फाळ प्रदेशात वाहतुकीसाठी केसाळ कुत्र्यांचा वापर केला जातो. तर उंचावर जिथे व्यवस्थित रस्ते नसतात, पायवाटा किंवा अवघड चढण असते, अशा ठिकाणी जाण्यासाठी पालखी किंवा डोलीचा वापर करतात. डोलीत किंवा पालखीत एखाद्या व्यक्तीला बसवून मागे-पुढे दोन माणसे मिळून डोली उचलून नेतात.