वाहतूक व संदेशवहन

माहीत आहे का तुम्हांला:

views

5:27
माहीत आहे का तुम्हांला :- मुलांनो कबुतरापासून ते उपग्रहापर्यंत वापरली जाणारी ही संदेशवहनाची साधने ही मानवाच्या विकासातील प्रगतीच्या एका एका टप्प्यातील आहेत. परंतु, मुलांनो ही गोष्ट झाली आधुनिक काळातील. परंतु, त्यापूर्वीचा माणूस आपल्या भावना, विचार किंवा संदेश एकमेकांना कसा पोहचवत असेल? तर मुलांनो आदिमानव त्याचे विचार व भावना व्यक्त करण्यासाठी हातवारे करणे, हावभाव करणे, विविध प्रकारचे सांकेतिक आवाज काढणे इत्यादींचा वापर करत असे. त्यानंतर विशिष्ट गोष्टींसाठी विशिष्ट आवाजाचा वापर होऊ लागला. असे करीत करीत मानवास स्वर सापडला व त्यातून भाषेची निर्मिती झाली. मानव संभाषणासाठी भाषेचा वापर करू लागला. करून पहा – मुलांनो ही मानवाची संदेशवहनाची रीत झाली. अशीच एकमेकांशी संवाद साधण्याची पदधत ही प्राणी व पक्ष्यांची असते. तुमच्या आसपास असलेल्या प्राण्यांचे निरीक्षण करा व ते आपल्याशी आणि एकमेकांशी संपर्क कसे साधतात ते पहा. मुलांनो, तुम्ही जर बारकाईने निरीक्षण केले तर तुम्हांला दिसून येईल, की प्राणी व पक्षी एखादे संकट आल्यास, आपल्या ओळखीचे कोणी दिसल्यास, खाद्य दिसल्यास, जखमी झाल्यास विशिष्ट असे आवाज काढतात.