नैसर्गिक आपत्ती

नवा शब्द शिका: आपत्ती

views

3:49
नवा शब्द शिका: आपत्ती :- आपत्ती म्हणजे अचानकपणे आलेले महाभयानक संकट होय. आपत्ती दोन प्रकारच्या असतात: मानवनिर्मित आपत्ती व नैसर्गिक आपत्ती. आपत्तीमुळे अनेक माणसे जखमी होऊ शकतात. तसेच मानवी मालमत्तेचे, संपत्तीचे प्रचंड नुकसान होते. होत्याचे नव्हते होते. या आणि अशा अनेक प्रकारच्या दुर्घटना नैसर्गिक कारणांमुळे घडून येतात. त्यांना नैसर्गिक आपत्ती असे म्हणतात. १)अवकाळी पाऊस :- मुलांनो, आपल्या देशात वर्षातील ठरावीक काळातच पाऊस पडतो. म्हणून अशा पावसाला मोसमी पाऊस असे म्हणतात. महाराष्ट्रात जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यात पाऊस पडतो. म्हणून या चार महिन्यांच्या कालावधीला आपण पावसाळा म्हणतो. उदा. महाराष्ट्रात पावसाळा सुरू व्हायच्या आधी म्हणजे एप्रिल, मे या महिन्यात काही ठिकाणी एखादया दिवशी अचानक ढग जमतात, विजा चमकतात आणि ढगांचा गडगडाट होतो. अचानक अंधारून येते नि थोडयाच वेळात जोराचा पाऊस पडू लागतो. त्याला आपण वळिवाचा पाऊस किंवा वळीव असे म्हणतो. मुलांनो, अनेक वेळा अवकाळी पावसाबरोबर गाराही पडतात. या गारांचा मारा जोरात लागतो. गारांचा मारा लागून माणसे, जनावरे जखमी होतात. घरांची कौले आणि पत्रे फुटतात. गारांचा मारा उभ्या पिकांना आणि फळबागांना बसल्यामुळे त्यांचे प्रचंड नुकसान होते. अशा प्रकारे मुलांनो अवकाळी पाऊस हा तोट्याचा असतो.