नैसर्गिक आपत्ती

पूर

views

4:47
पूर :- मुलांनो, नदीपात्रातून पावसाचे पाणी बाहेर पडून आसपासच्या प्रदेशात घुसणे म्हणजे पूर येणे होय. नदीला पूर, महापूर कशामुळे येतो ते आता आपण पाहू. सलग पाऊस पडल्याने नदीचे पाणी आसपासच्या वस्तीत, घरात व शेतात घुसते. पुरामुळे नदीकाठावर असलेली मातीची घरे कोसळतात. गुरे आणि माणसे या पुराच्या पाण्यात बुडून मरण्याची शक्यता असते. पुराचे पाणी वस्तीत साठल्याने दैनंदिन जीवन प्रचंड अडचणीत येते. अशी पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर उंच, सुरक्षित ठिकाणी जावे आणि पूर ओसरल्यावरच मग घरी परत यावे. भूकंप :- “भूकवचामध्ये म्हणजेच भूपृष्ठाच्या वरच्या थरामध्ये अचानक कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यास भूकंप असे म्हणतात.’’ मुलांनो, भूकंपात छप्पर कोसळणे, भिंत कोसळणे यांसारख्या गोष्टी घडतात. त्यामुळे भूकंपामध्ये पाळीव जनावरांचाही मृत्यू होतो किंवा ती जखमी होतात. भूकंप झाला तर घाबरू नये, भूकंप हा फार काळ नसतो.