आपण परिसर धोक्यात आणत आहोत का?

माणसाचा विकास

views

4:31
माणसाचा विकास:- मुलांनो, जगात मानव, वाघ, सिंह, ससा, माकड, अस्वल यांसारखे सजीव प्राणी आहेत. पण या सर्व सजीव प्राण्यांत मानव हा अतिशय बुद्धिमान प्राणी आहे. मानवाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे मानव बोलू शकतो. आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून तो आपले जीवन अधिक सुखकर बनवू शकतो. परिसरातील वस्तूंचा वापर करून तो नवीन वस्तू व पदार्थांची निर्मिती करू शकतो. मुलांनो, माणसाला ही प्रगती साधण्यासाठी अनेक वर्षे लागली. ती त्याने टप्प्याटप्प्याने साधली. पूर्वी गावाला जायचे असेल तर माणसे पायी, घोडयावरून अथवा बैलगाडीने जात असत. आता सध्याच्या काळात मात्र आपण बस, जीप, कार, आगगाडया अशा अनेक आधुनिक वाहतुकीच्या सुविधांचा वापर करत असतो. यामुळे आपले कष्टही वाचतात आणि वेळही कमी लागतो.