आपण परिसर धोक्यात आणत आहोत का?

जरा डोके चालवा

views

5:05
जरा डोके चालवा.: मुलांनो, पूर्वी शेतीसाठी वर्षातून केवळ पावसाळ्यातच पाणी मिळत असे. म्हणजे फक्त चार महिन्यांतच शेती पिकवली जात असे. आता शेतातून दोन पिके घेतली जातात. त्या दोन पिकांसाठी आठ महिने पाणी लागते. तर जिथे तिबार पिके घेतात, म्हणजेच वर्षातून तीन - तीन पिके घेतली जातात तिथे तर शेतीसाठी वर्षभर पाणी लागते. मुलांनो पूर्वी शेतकरी डिझेलवरील इंजिने किंवा विजेवरील मोटारी यांचा वापर पाण्यासाठी करीत नसत. तर ते शेतीला पाणी देण्यासाठी पारंपरिक पद्धतीचा वापर करीत असत. हे पाणी कशा पद्धतीने दिले जात असे याची आता आपण माहिती घेऊ. मुलांनो पूर्वी शेतकरी डिझेलवरील इंजिने किंवा विजेवरील मोटारी यांचा वापर पाण्यासाठी करीत नसत. तर ते शेतीला पाणी देण्यासाठी पारंपरिक पद्धतीचा वापर करीत असत. हे पाणी कशा पद्धतीने दिले जात असे याची आता आपण माहिती घेऊ.