आपण परिसर धोक्यात आणत आहोत का?

आपण काय शिकलो

views

3:19
आपण काय शिकलो. या पाठातून आपण पुढील गोष्टी शिकलो: १) माणसाला खनिजतेलाचा शोध लागल्यावर त्याने खनिजतेलावर चालणाऱ्या गाडयांचा शोध लावला. उदाहरणार्थ मोटारसायकल, बस, ट्रक, कार, स्कूटर अशा वाहनांचा शोध लावला. दगडी कोळशाचा इंधन म्हणून वापर करून त्याने आगगाड्यांही चालवल्या. या शोधांमुळे प्रवास करणे सोपे झाले. २) मानवाने धरणे बांधली, रस्ते आणि लोहमार्ग बनविले, कारखाने काढले. या सर्वांसाठी लागणारा माल कारखान्यातून मिळवला. या कारखान्यातील घाण, दूषित झालेले पाणी आपण नदीत सोडले. त्यामुळे नदी परिसराची हानी झाली. त्याचे संपूर्ण सजीवसृष्टीवर वाईट परिणाम झाले. हे नेहमी लक्षात ठेवा.: मुलांनो, निसर्ग आपल्याला भरभरून सर्व काही देत असतो. आपल्या गरजेच्या सर्व वस्तू आपल्याला परिसरातूनच मिळत असतात. त्या गरजेच्या वस्तू परिसरातून मिळवताना किंवा त्यांचा वापर करताना परिसरावर वाईट परिणाम होऊ नये, यासाठी आपण नेहमीच काळजी घेतली पाहिजे. आपण जर निसर्गाची योग्य प्रकारे देखभाल केली, तरच निसर्ग आपल्याला हवे ते व हवे तेवढे देईल, याचे भान सर्वांनी राखणे गरजेचे असते.