वाहतूक

प्रस्तावना

views

4:42
मुलांनो, आज आपण जो पाठ शिकणार आहोत त्याचे नाव वाहतूक असे आहे. प्रथम आपण वाहतूक म्हणजे काय, हे जाणून घेऊ. वाहतूक म्हणजे एखादया ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी व्यक्ती किंवा मालाची ने – आण करणे होय. आपल्याला माहीतच आहे की प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. त्यातील एक चांगली, तर दुसरी वाईट असू शकते. वाह्तुकीचेही तसेच आहे. वाहतुकीच्या सोयी सुविधांमुळे व्यक्ती व वस्तूंची जलदगतीने ने – आण होऊ लागली. त्यातून वेळेची व कष्टाची बचत होऊ लागली. परंतु, वाहतुकीच्या साधनांचा मोठया प्रमाणात वापर केल्याने ध्वनिप्रदूषण व हवेचे प्रदूषण यांसारख्या समस्या निर्माण झाल्या. त्या कशा निर्माण झाल्या व त्यावर कोणते उपाय आहेत या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत. अगदी बरोबर उत्तरे दिलीत तुम्ही! मुलांनो, रवीने तीन प्रकारे केलेल्या प्रवासामुळे आणि या प्रश्नोत्तरांमुळे तुमच्या लक्षात आले असेल की पायी चालत गेल्यामुळे शाळेपर्यंत पोहचण्यासाठी अधिक वेळ लागला. तसेच दप्तराचे ओझे स्वत:ला वाहून न्यावे लागल्याने श्रम करावे लागले. या उलट वाहनाचा वापर केल्यामुळे वेळेची व श्रमाची बचत होते. आपण हव्या त्या ठिकाणी लगेच पोहचू शकतो. त्याचबरोबर तुमच्या हेही लक्षात आले असेल की स्वयंचलित वाहनांसाठी पेट्रोल, डिझेल यांसारख्या इंधनांचा वापर करावा लागतो. उदा. मोटार सायकल, ऑटोरिक्षा, कार, बस, ट्रक, रेल्वे, जहाजे, विमान इ. वाहतुकीची साधने आहेत. यांचा आपल्याला रोजच्या दैनंदिन जीवनात वापर करावा लागतो.