पाणी

प्रस्तावना

views

3:42
प्रस्तावना: मुलांनो, पृथ्वीवरील जी काही सजीवसृष्टी आहे, त्या सजीव सृष्टीला वाढीसाठी व जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारे घटक म्हणजे सूर्यप्रकाश, पाणी आणि अन्न. या तीन घटकांवरच सजीवांचे जीवन अवलंबून असते. यातील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी होय. या घटकाची सविस्तर माहिती आपण या पाठात पाहणार आहोत. याचा अभ्यास आपण मागील इयत्तांमध्ये केला आहे. त्याची थोडी उजळणी करू. त्यासाठी माझ्या काही प्रश्नांची उत्तरे द्या. पाण्याचे प्रदूषण: मुलांनो, तुम्हाला माहीत असेल की पाणी विविध कारणांनी दुषित होत असते. पाण्यात अनेक घटकांचे मिश्रण होऊन पाणी दूषित होते. ते कसे होते ते समजून घेण्यासाठी पुढील प्रयोग करून पहा. मुलांनो, तुम्हाला माहीतच आहे, की नद्या, सरोवरे हे आपले पाण्याचे स्त्रोत आहेत. म्हणजेच यांच्यापासून आपल्याला पाणी मिळत असते. त्यातील पाण्याचे प्रदूषण कसे होते? ते आपण पुढे पाहणार आहोत.