बेरीज २० पर्यंत

प्रस्तावना बेरीज २० पर्यंत

views

4:35
बेरीज २० पर्यंत: मुलांनो, माझ्याकडे दोन पेन्सिली आणि रोहनकडे दोन पेन्सिली आहेत. आणि या सर्व पेन्सिली मी एकत्र केल्या तर दोघांच्या मिळून किती पेन्सिली होतील? वि : सर, चार पेन्सिली होतील. शि: अगदी बरोबर! बेरीज कशी करतात ते आपल्याला माहीतच आहे. पण आज आपण २० पर्यंतची बेरीज कशी करतात ते शिकणार आहोत. हे पहिले उदाहरण पहा. या उदाहरणात डाव्या बाजूला ५ कप आहेत आणि उजव्या बाजूला ४ कप आहेत तर एकूण किती कप होतील? तर पहा: आता या डाव्या ठिकाणी ५ कप आहेत आणि उजव्या बाजूला ४ कप आहेत. मग या ५ मध्ये ४ कप आपण मिळवले तर त्यांची बेरीज येणार ९. म्हणजेच ५ च्या पुढे ४ संख्या क्रमाने मोजल्या तर ६, ७, ८, ९ येणार. उत्तर मिळाले ९. शि: अगदी बरोबर! म्हणजेच उत्तर येईल १३. आता ही एक माळ आहे त्यात १३ मणी आहेत त्यामध्ये आणखी २ मणी मिळवले तर एकूण किती मणी होतील? वि: सर, या १३ मण्यांमध्ये आणखी २ मणी मिळवले तर १४, १५. म्हणजे एकूण १५ मणी होतील, सर, उत्तर १५ येईल. शि: शाब्बास म्हणजे तुम्हाला आता २० पर्यंत बेरीज कशी केली जाते ते कळलं आहे.