बँक व सरळव्याज

बँक व बँकेतील खाती

views

5:10
बँक व बँकेतील खाती: मुलांनो, आज आपण बँक आणि सरळव्याज ह्या गोष्टींविषयी जाणून घेणार आहोत. चालू खाते (current account) : बँकेमध्ये अनेक प्रकारची खाती असतात. त्यामध्ये चालू खाते हा एक प्रकार असतो. यालाच इंग्रजीत current account असे म्हटले जाते. या खात्यातून आपण रोज कितीही वेळा पैसे काढू शकतो. पण या खात्यातील पैशांवर व्याज मात्र मिळत नाही. बचत खाते (Saving account) : बँकखात्यातील दुसरा प्रकार म्हणजे बचत खाते होय. बचत खाते याला इंग्रजीत saving account असे म्हणतात. एखाद्या व्यक्तीला ठरावीक रक्कम बँकेमध्ये जमा करून बचत खाते उघडता येते. काही बँकांमध्ये काहीही रक्कम जमा न करता खाते उघडता येते. या खात्यावर दररोजच्या जमा शिलकेच्या आधारे बँक काही व्याज देते. आवर्ती ठेव खाते (Recurring deposit account) : बँकखात्यातील तिसरा प्रकार म्हणजे आवर्ती ठेव खाते. या खात्याला इंग्रजीत Recurring Deposite Account असे म्हणतात. आवर्त ठेव म्हणजे, खातेदारला बँकेत एक विशिष्ट रक्कम प्रत्येक महिन्याला एका विशिष्ट कालावधीपर्यंत जमा करावी लागते. ती किती असावी ते बँक खातेदार ठरवतात. या प्रकारच्या ठेवींवर बँक व्याज देते. मुदत ठेव (Fixed deposit): बँकखात्यातील चौथा प्रकार म्हणजे मुदत ठेव. याला इंग्रजीत Fixed Deposit असे म्हणतात. ठेवीदार ठराविक रक्कम ठराविक कालावधीसाठी बँकेत जमा करू शकतो. अशा खात्यास मुदत ठेव खाते असे म्हणतात. या प्रकारच्या ठेवींवर बँक व्याज देते. अशी ही बँकेत विविध खाती असतात.