हवा

प्रस्तावना

views

2:14
आजच्या पाठाची सुरूवात आपण एका कोड्याने करणार आहोत. आपण एक प्रयोग करू. त्यासाठी एका मोठ्या भांडयात पाणी घेऊ. त्यानंतर एक रिकामे उभट भांडे घेऊ. आता ते रिकामे उभट भांडे उपडे करून पाण्याच्या पृष्ठभागावर तसेच उभे धरून पाण्यात खाली खाली दाबू. थोडे खाली गेल्यानंतर भांडे तिरपे करू.पहा, भांडे तिरपे केल्यानंतर काय झाले? आपण भांडे सरळ खाली दाबत होतो तोपर्यंत काही झाले नाही. परंतु भांडे तिरपे केले की, हवेचे बुडेबुडे लगेच पाण्याच्या वर येऊ लागले. यावरून आपल्याला असे समजते की, हवा पाण्यापेक्षा हलकी असते. म्हणून भांडे तिरपे झाले की हवेचे बुडेबुडे पाण्याबाहेर वर येतात. याचा अर्थ असा होतो की जे भांडे आपण रिकामे म्हणून घेतले होते, त्या भांड्यात हवा होती. म्हणजेच आपल्या सभोवती हवा आहे. डोळ्यांना रिकाम्या दिसणाऱ्या जागांमध्ये देखील हवा असते.