बल व दाब

प्लावक बल

views

3:02
आता आपण प्लावक बलाविषयी माहीती अभ्यासूया. प्लावक बल ही संकल्पना समजून घेण्यासाठी सर्वप्रथम आपण एक प्रयोग करूया. प्रथम एक प्लास्टिकची रिकामी हलकी बाटली घ्या. त्या बाटलीचे झाकण घट्ट लावून घ्या. आता ही बाटली पाण्यात टाका आणि सांगा काय झाले? बाटली पाण्यावर तरंगत राहिली. प्लास्टिकची घट्ट झाकण बसवलेली रिकामी बाटली पाण्यावर तरंगत राहते. आता ही बाटली पाण्यात ढकलून खाली जाते का पहा? ही बाटली पाण्याच्या आतमध्ये तरंगताना दिसते आहे. बाटली आपण पाण्यात खाली ढकलली तरी ती परत वर येऊन तरंगत राहते. शि: बरोबर! अशाच प्रकारे आपण प्लास्टिकचा पोकळ चेंडू घेतला व तो पाण्यात बुडवला तरीही तो तरंगतच राहणार. आता ही प्लास्टिकची बाटली पाण्याने काठोकाठ भरा आणि घट्ट झाकण लावून पाण्यात सोडा. सांगा, आता तुम्हाला काय दिसलं? पाण्यात किंवा अन्य द्रवात किंवा वायूत असलेल्या वस्तूवर वरच्या दिशेने प्रयुक्त बलाला प्लावक बल म्हणजेच (fb) असे म्हणतात. पाण्यात बुडालेल्या ठोकळयावर किंवा रिकाम्या प्लास्टिकच्या बाटलीवर कार्य करणारे पाण्याचे बल ठोकळयाला वर ढकलते. या वर ढकलणा-या बलालाच प्लावक बल असे म्हणतात. द्रवात बुडालेल्या वस्तूंचे आकारमान जास्त असले की प्लावक बल अधिक असते. प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा कमी असले की वस्तू पाण्यात बुडते. आणि प्लावक बल वस्तूच्या वजनाइतके असले की वस्तू द्रवाच्या आतमध्ये तरंगत राहते.