चलन

प्रस्तावना

views

3:26
आज आपण चलनाचा अभ्यास करणार आहोत. चलनाच्या काळ, काम, वेग या प्रकारांविषयी जाणून घेणार आहोत. चलनाची संकल्पना समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू या. सूजय, शर्मिष्ठा, सना हे तिघे सेंट जॉर्ज या शाळेत शिकत आहेत. सुजय शाळेपासून 5km अंतरावर राहतो. शर्मिष्ठा शाळेपासून 7km अंतरावर राहते. आणि सना शाळेपासून 9km अंतरावर राहते. तिघेही सायकल वरून जातात. त्यांचा वेग समान आहे. जर तिघेही एकाच वेळी निघत असतील तर घरी लवकर कोण पोहोचेल ? सुजय घरी लवकर पोहोचेल. कारण त्याच्या घराचे अंतर शाळेपासून इतर दोघांपेक्षा कमी आहे. सनाला घरी जायला इतर दोघांपेक्षा जास्त वेळ लागेल. कारण तिच्या घराचे अंतर शाळेपासून लांब आहे.