चित्रात दाखवलेली संख्या

प्रस्तावना चित्रात दाखवलेली संख्या

views

5:06
चित्रांमधील संख्या अंकात आणि शब्दांत: शि: मुलांनो, आता या चित्रांमध्ये एककाच्या घरात आणि दशकाच्या घरात किती वस्तू आहेत त्यावरून तुम्ही संख्या सांगा. त्या आपण अंकात आणि शब्दात लिहू. शि: सांगा: पहिल्या चित्रात किती मणी आणि किती माळा आहेत? वि: बाई ४ मणी आहेत म्हणून एककाच्या घरात ४ लिहा. आणि दशकाची एकच माळ आहे म्हणून दशकाच्या घरात १ लिहा. शि: बरोबर! मग ही संख्या कोणती आहे? वि: १४. आणि त्याचे शब्दात लेखन चौदा असे करणार. शि: खूपच छान! या दुसऱ्या चित्रात किती नाणी आणि किती नोटा आहेत? वि: बाई ८ नाणी आणि २ नोटा आहेत. शि: अगदी बरोबर! म्हणून मी एककाच्या घरात ८ लिहिते. आणि दशकाच्या घरात २ लिहिते. ही संख्या २८ आहे. आणि त्याचे वाचन आपण वीस आठ-अठ्ठावीस असे करतो. शि: या तिसऱ्या चित्रात माचीसच्या किती काड्या आहेत आणि किती बंडलं आहेत? वि: बाई ७ काड्या आणि ४ बंडल आहेत. शि: अगदी बरोबर. म्हणून मी एककाच्या घरात ७ आणि दशकाच्या घरात ४ लिहिते. ही संख्या आहे ४७. त्याचे शब्दात लेखन चाळीस सात –सत्तेचाळीस असे करतो.