उष्णतेचे मापन व परिणाम

एकके

views

4:10
एकके समजण्यासाठी आपण एक कृती करू. प्रथम एकाच आकाराची दोन स्टीलची भांडी घ्या. त्यांना 'अ' व 'ब' अशी नावे द्या. यातील 'अ' भांडयामध्ये थोडे पाणी भरा. व 'ब' भांडयामध्ये 'अ' च्या दुप्पट पाणी भरा. दोन्ही भांड्याचे तापमान सारखे आहे हे तपासून घ्या. आता एक स्पिरीटचा दिवा घेऊन अ व ब मधील पाण्याचे तापमान 100C ने वाढवा. म्हणजेच सारखेच तापमान वाढविण्यासाठी 'अ' व 'ब' भांडयातील पाण्यांना वेगवेगळा वेळ लागला. यावरून आपल्या लक्षात येते की, 'अ' व 'ब' मधील पाण्याचे तापमान हे सारखेच आहे. परंतु ‘ब’ मधील पाण्यातील उष्णता ही 'अ' भांडयातील पाण्यापेक्षा जास्त आहे. तापमान मोजण्यासाठी सेल्सिअस (0C), फॅरेनहाईट (0F), व केल्व्हीन (K) ही एकके वापरली जातात. या एककांपैकी केल्व्हीन (K) हे एकक शास्त्रीय प्रयोगामध्ये वापरले जाते. आणि सेल्सियस (0C), फॅरेनहाईट (0F) ही एकके दैनंदिन व्यवहारात वापरली जातात. या तिन्हीतील संबंध खालील सूत्राने दाखवता येतो.