स्थानिक किंमत म्हणजे काय Go Back प्रस्तावना स्थानिक किंमत म्हणजे काय views 5:36 स्थानिक किंमत म्हणजे संख्येतील एखादा अंक कोणत्या स्थानावर आहे ते पाहून त्याची किंमत सांगणे. ते स्थान म्हणजेच त्या अंकाची स्थानिक किंमत असते. उदाहरणार्थ ३५ ही संख्या आहे. या संख्येत ३ दशक स्थानी व ५ एककस्थानी आहे. ३ दशक सुट्टे केले की आपल्याला ३० एकक मिळतात. कारण १ दशक म्हणजे १० एकक आणि ३ दशक म्हणजे ३० एकक. म्हणून ३५ या संख्येत ३ ची स्थानिक किंमत ३० आहे. ५ एककस्थानी आहे म्हणून ५ ची स्थानिक किंमत ५ हीच आहे. म्हणजेच ३ दशक आणि ५ एकक = तीस पाच पस्तीस. उदाहरण: ५० या संख्येत ५ दशकस्थानी व ० एकक स्थानी आहे. ५ दशकाचे सुट्टे केले तर ५० एकक मिळतात. कारण १ दशक = १० एकक. म्हणून ५ दशक = ५० एकक. ५० या संख्येत ५ दशक स्थानी असल्यामुळे ५ ची स्थानिक किंमत ५० आहे. आणि शून्य एकक स्थानी असल्याने शून्यची स्थानिक किंमत शून्य हीच आहे. म्हणजेच पाच दशक आणि शून्य एकक बरोबर पन्नास. प्रस्तावना स्थानिक किंमत म्हणजे काय