बेरीज-पुढे मोजून Go Back प्रस्तावना views 4:52 आपण बेरीज कशी करायची हे पहिलीतच शिकलो होतो. तर आज आपण बेरीज सोप्या पद्धतीने कशी करायची ते शिकणार आहोत. सलमा ही २ रोपं घे, आणि तुझ्या अंगणात लाव. बाई नक्की लावेन. माझ्या घरी आधीच ५ रोपे लावली आहेत. सलमाच्या घरी आधी लावलेली ५ रोपे आहेत. आणि मी आणखी २ रोपे तीला तिच्या अंगणात लावायला सांगितली आहेत. मग सांगा, सलमाच्या अंगणात एकूण किती रोपे होतील? सात रोपं होतील. बरोबर! पण तुम्ही दोघांनी त्या रोपांची मोजणी कशी केली सांगा पाहू? २ बोटे + ५ बोटे त्यांची बेरीज मी १,२,३,४,५,६,७ अशी ७ पर्यंत मोजली. म्हणजेच झाली ७ बोटे. समजा ९ काड्या आणि ३ काड्या यांची बेरीज करण्यासाठी त्या एकत्र केल्या आणि मोजल्या तर एकूण किती काड्या होतील? मी तीनच्या पुढे ९ काड्या मोजल्या तर एकूण १२ काड्या झाल्या. मी ९ च्या पुढे तीन काड्या मोजल्या. तर माझे पण उत्तर १२ आले. आपण ३ च्या पुढे ९ काड्या मोजल्या काय किंवा ९ च्या पुढे ३ काड्या मोजल्या काय उत्तर सारखेच येते. पण जर आपण मोठ्या संख्येमध्ये छोटी संख्या मिळवली तर मोजणे खूपच सोपे होते. म्हणून इथे ३ च्या पुढे मोजण्या ऐवजी ९ च्या पुढे ३ काड्या मोजा. १०,११, १२. समजले? प्रस्तावना पुढे मोजून बेरीज कर