ओळखुया, नाणी नोटा

नाणी, नोटा

views

4:39
तुम्हांला पैसे किंवा रुपये म्हणजे काय हे माहीतच आहे. पैसे किंवा रुपये हे दोन स्वरुपात उपलब्ध असतात. ते म्हणजे नाणी किंवा नोटांच्या स्वरुपात. मग मला सांगा तुम्ही कोण कोणत्या नोटा पहिल्या आहेत. आम्ही ५० रु. ची नोट आणि १०० रु. ची नोट पहिली आहे. बरोबर याखेरीज २०० रु. ची नोट, ५०० रु. ची नोट, १००० रु. ची नोट, इतकेच काय तर २००० रु. ची नोट ही बाजारात उपलब्ध झाली आहे. आम्ही १ रु चे नाणे, २ रु. चे नाणे, ५ रु. चे नाणे आणि १० रुपयांचे नाणे पाहिले आहेत. तुम्हांला नाणी ओळखता येतात का ते पाहू. सांगा हे कोणते नाणे आहे? आता मी तुम्हांला एक उदाहरण विचारते तुम्ही त्याचे उत्तर द्या. समजा यश आणि रमा आईसोबत मामाच्या गावी आले आहेत. आज गावात जत्रा आहे. दोघेही जत्रेला जाण्यासाठी निघाले. मामाने दोघांनाही प्रत्येकी १०० रु. दिले. रमाला काही वस्तू घ्यायच्या होत्या. पण दुकानदाराकडे सुट्टे पैसे नव्हते. म्हणून रमा नंदूकाकांच्या दुकानात गेली. आणि तिने १०० रुपये सुट्टे मागितले. तर तिला नंदूकाकांनी पुढीलप्रमाणे सुटे दिले. बाई ५० रु. ची १ नोट, २० च्या २ नोटी, ५ चे १ नाणे, २ ची २ नाणी आणि १ चे १ नाणे. तर मग आता तुम्ही सांगा आणखी कोण कोणत्या प्रकारे नंदूकाका सुटे देऊ शकतो? ५० च्या २ नोटा देऊ शकतो. १० ची १० नाणी देऊ शकतो. ५ ची २० नाणी देऊ शकतो. २० च्या ५ नोटा पण देऊ शकतो. ५० ची १ नोट, २० ची १ नोट आणि १० ची ३ नाणी देऊ शकतो.