धरकता मोजून

धारकता मोजणे

views

3:03
इथे बादली आणि चहाचे कप ठेवले आहे. समजा मी यामध्ये पाणी ओतले तर सांगा कोणत्या भांड्यात सर्वात जास्त पाणी मावेल? बादलीमध्ये सर्वात जास्त पाणी मावेल. हा इथे ग्लास आहे आणि चहाचा कप आहे. मग या दोघांपिकी कोणत्या भांड्यात जास्त पाणी मावेल? ग्लास मध्ये पाणी जास्त मावेल. कारण ग्लास हा कप पेक्षा मोठा असतो. माझ्याकडे काही भांडी आहेत. जसे बादली, पातेले, तांब्या, ग्लास. आणि हा आहे चहाचा कप. समजा मी या कपाने या प्रत्येक भांड्यात पाणी भरायचे ठरवले तर कोणत्या भांड्यात जास्त कप पाणी मावेल आणि कोणत्या भांड्यात कमी कप पाणी मावेल? बादलीत जास्त कप पाणी ओतावे लागेल. आणि ग्लासात सर्वात कमी कप पाणी ओतावे लागेल. शाब्बास अगदी बरोबर उत्तर दिलेस.