माहितीचे व्यवस्थापन

प्रस्तावना

views

5:05
वर्षाचे महिने, महिन्यातील तारखा, आठवड्याचे दिवस, सण या सर्वांची माहिती तुम्हांला कशातून मिळते? कॅलेंडर मधून. यालाच आपण मराठीत दिनदर्शिका म्हणतो. तर या दिनदर्शिकेतील माहितीचा वापर करून आज आपण बरीच माहिती मिळवणार आहोत. चला तर मग करूया सुरवात. इथे जानेवारी ते डिसेंबर पर्यंतचे महिने दिले आहेत. तुम्ही त्या त्या महिन्यातील दिवसांची संख्या सांगा. जानेवारी -३१, फेब्रुवारी -२८/२९, मार्च-३१, एप्रिल- ३०, मे-३१, जून- ३०, जुलै-३१, ऑगस्ट-३१, सप्टेंबर-३०, ऑक्टोबर-३१, नोव्हेंबर-३०, डिसेंबर-३१. पाहिलंत या दिनदर्शिकेचे प्रत्येकाच्या जीवनात किती महत्त्व आहे ते? याचा उपयोग करून आपण आपल्या पुढील कार्याची आखणी करीत असतो. म्हणून ही फार महत्त्वाची आहे.