प्रकाशाचे परावर्तन

उदाहरण

views

02:37
आपण आरशाच्या सूत्रानुसार व विशालनानुसार एक उदाहरण सोडवूया. उदा1) राजश्रीला 10 सेमी नाभीय अंतर असलेल्या अंतर्वक्र आरशाच्या साहाय्याने आरशापासून 30 सेमी अंतर असलेल्या वस्तूची 5 सेमी उंचीची उलटी प्रतिमा मिळवायची आहे. तर तिने पडदा आरशापासून किती अंतरावर ठेवावा? तसेच तिने मिळवलेल्या प्रतिमेचे स्वरूप व वस्तूचा आकार काय असेल? मुलांनो, या उदाहरणात काय दिलेले आहे ते सर्वप्रथम आपण लिहून घेऊ. नाभीय अंतर f = 10 सेमी, वस्तूचे अंतर = u = -30 सेमी, प्रतिमेची उंची h2 = - 5 सेमी. तर आपल्याला प्रतिमेचे अंतर v व वस्तूची उंची h1 काढायची आहे. सर्वप्रथम आपण आरशाच्या सूत्रानुसार अंतर व उंची पाहूया. (1 )/(v ) + (1 )/(u ) = (1 )/(f ) (1 )/(v ) = (1 )/(f ) - (1 )/(u ) (1 )/(v ) = (1 )/(– 10 ) - (1 )/(– 30 ) (1 )/(v ) = (-33+111 )/(3030 30 ) (1 )/(v ) = (-22 )/(3030 30) (1 )/(v ) = (1 )/(- 15 ) ∴ v = -15 आरशापासून पडद्याचे अंतर 15 सेमी असावे. म्हणून राजश्रीला पडदा आरशापासून 15 सेमी अंतरावर ठेवावा लागेल. आता आपण प्रतिमेचे विशालन काढूया. विशालन: m=h_2/h_1 = -v/u h1 = - (uh_2)/v h1 = - ((-30) x (-5 ) )/(– 15 ) h1 = (- 2) x (- 5) h1 = 10 सेमी. वस्तूची उंची 10 सेमी असेल. म्हणजेच प्रतिमा वास्तव व वस्तूपेक्षा लहान असेल. तर आपण या पाठांमध्ये आरसा व आरशाचे प्रकार अभ्यासले आहेत. तसेच गोलीय आरसे व त्याद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा व गोलीय आरशामूळे होणारे विशालन पाहिले आहे.