अनुवंशिकता व परिवर्तन

डी.एन.ए

views

05:30
गुणसूत्रे ही डी.एन.ए. ची बनलेली असतात. फेड्रिक मिशर यांनी 1869 साली श्वेत रक्तपेशींवर संशोधन करताना DNA चा शोध लावला. सर्वात प्रथम हे आम्ल केंद्रकात सापडले म्हणून याचे नाव ‘केंद्रकाम्ल’ (Nulic Acid) असे ठेवण्यात आले. पेशीच्या इतर भागातही हे केंद्रकाम्ल आढळून येते. डी.एन.ए. चे रेणू विषाणू- जीवाणूंपासून माणसांपर्यंत सर्वच सजीवांत आढळतात. हे रेणू पेशीचे कार्य, वाढ व विभाजन म्हणजेच प्रजनन नियंत्रित करतात. म्हणून त्या रेणूंना प्रधान रेणू (Master Molecule) असे म्हणतात. डी.एन.ए. रेणूची रचना सर्वच सजीवांत एकसारखी असते. इ.स.1953 साली वॅटसन आणि क्रिक या दोन शास्त्रज्ञांनी DNA रेणूची प्रतिकृती तयार केली. या प्रतिकृतीत न्युक्लीओटाइडचे दोन समांतर धागे एकमेकांभोवती गुंडाळलेले असतात. त्यांना ‘द्विसर्पिल’ (Double helix) रचना असे म्हणतात. डी.एन.ए. रेणूतील प्रत्येक धागा ‘न्युक्लीओटाइड’ नावाच्या अनेक लहान रेणूंचा बनलेला असतो. नायट्रोजनयुक्त पदार्थ अॅडेनीन, ग्वानीन, सायटोसीन व थायमीन अशा चार प्रकारचे असतात. त्यापैकी अॅडेनीन व ग्वानीन यांना ‘प्युरिन्स’ असे म्हणतात. तर सायटोसीन व थायमीन यांना पिरिमिडीन्स असे म्हणतात. न्युक्लीओटाइडच्या रचनेमध्ये शर्करेच्या एका रेणूला एक नायट्रोजनयुक्त पदार्थाचा रेणू व एक फॉस्फोरिक आम्लाचा रेणू जोडलेला असतो. नायट्रोजनयुक्त पदार्थ चार प्रकारचे असल्यामुळे न्युक्लीओटाइडसुद्धा चार प्रकारचे असतात.