What is Soft skills Go Back What is Soft skills views 03:55 सॉफ्ट स्कील आणि हार्ड स्कील याबद्दल आपण बहुतेकदा ऐकत असतो. पण हे हार्ड स्कील किंवा सॉफ्ट स्कील म्हणजे नक्की काय या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी आपण हा व्हिडीओ पाहूया. हार्ड स्कील. कोणतंही काम, यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी, ते करण्याची अचूक पद्धत आणि त्याचं योग्य प्रशिक्षण मिळणं, खूप आवश्यक असतं. आपल्याला शाळा-महाविद्यालयात मिळतं, ते तांत्रिक शिक्षण असतं. म्हणजे हार्ड स्किल. हार्ड स्कीलमुळे आपण नोकरी किंवा व्यवसाय करू शकतो. हीआपली व्यावसायिक ओळख असते. पण, हे हार्ड स्किल वापरण्यासाठी, अन्य काही गोष्टींचीदेखील आवश्यकता असते. त्याला, सॉफ्ट स्कील, असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर, व्यवसाय किंवा नोकरी मिळवण्यासाठी आणि ती टिकवण्यासाठी,आवश्यक असणारी व्यक्तिमत्त्व कौशल्य, म्हणजे सॉफ्ट स्कील. नोकरी असो की व्यवसाय, कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी, आपला ठसा उमटवण्यासाठी हार्डआणि सॉफ्ट स्कील हे दोन्ही आवश्यक आहे. What is Soft skills