Types of Soft skills Go Back Types of Soft skills views 07:03 कोणतंही काम, प्रत्यक्षपणे पूर्ण करण्यासाठी विशिष्ट प्रशिक्षण, तंत्र आणि पूर्वानुभव यांची गरज असते. ते हार्ड स्कील. पण तेच काम पूर्ण करण्यासाठी हार्ड स्किल व्यतिरिक्त ज्या कौशल्यांची आणि गुणांची गरज असते, ते सॉफ्ट स्कील. हार्ड स्कील वापरून एखादं काम पूर्ण करत असताना वेगवेगळ्या प्रकारची सॉफ्ट स्कीलसुद्धा वापरावी लागतात. तेव्हाच काम यशस्वीपणे पार पडतं. एका व्यक्तीकडे एकाच प्रकारचे हार्ड स्कील म्हणजेच तांत्रिक शिक्षण असेल तर काम नक्कीच पार पडेल, परंतु, त्या व्यक्तीला यश मिळवणं कठीण होईल. उदाहरणार्थ, एखादी सेल्स वूमन तिच्या ग्राहकांसोबत व्यवस्थित बोलत नाही, त्यांना उत्पादनांची योग्य ती माहिती देत नाही. कदाचित तिच्या दुकानात विक्री होईल, पण ग्राहक पुन्हा त्या दुकानात जाणार नाहीत. त्याऐवजी, ग्राहक अशा दुकानात जातील, जिथे त्यांना योग्य मार्गदर्शन करणारी, उत्पादनांविषयी माहिती देणारी सेल्स वूमन असेल. म्हणजेच, व्यक्तीला काम करताना वेगवेगळ्या टप्प्यांवर, वेगवेगळ्या प्रकारची सॉफ्ट स्किल वापरावी लागतात. तरच, आपलं काम टिकून राहतं. त्यात वाढ होत राहते. आणि कामावर आपण स्वतःचा ठसा उमटवू शकतो. Types of Soft skills