Communication skills

Communication skills

views

05:54
सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत रोजचा व्यवहार करण्यासाठी, आपण ज्या प्रकारांनी एकमेकांशी बोलतो किंवा संपर्क करतो त्यास आपण संवाद असं म्हणतो. संवाद हा मानवी जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा समजला जातो. म्हणूनच व्यक्तिमत्त्व विकासाची पहिली आणि महत्त्वाची पायरी संवादकौशल्य समजली जाते. संवादकौशल्य समजून घेण्याआधी, आपण संवाद म्हणजे नक्की काय हे समजून घेऊ. दोन किंवा अधिक व्यक्ती कोणत्याही स्वरूपाच्या माहितीची देवाण घेवाण करतात तेव्हा त्यास आपण संवाद घडला असं म्हणतो. ती माहिती एखादा संदेश, एखादी कल्पना, प्रश्न किंवा अनुभव यापैकी काहीही असू शकते.