Quality structure of Public speaking Go Back Quality structure of Public speaking views 04:51 जनसंवाद साधताना आपण ज्या विषयावर बोलणार असाल त्या विषयाचा आशय जनसंवादकाकडे असावा. योग्य आशय सोबतच त्याची मुद्देसूद मांडणी करावी व त्याचप्रमाण बोलावं. स्पष्ट उच्चार: जे बोलले जात आहे ते जर जनसमुदायास समजणारच नसेल तर त्या संवादास काही अर्थच उरत नाही. कोणत्याही प्रकारचा जनसंवाद असो, भाषण, वर्गात शिकवणं किंवा मुलाखत देणं; संवाद साधणाऱ्या व्यक्तीच्या शब्दांचा उच्चार स्पष्ट नसेल तर ऐकणाऱ्या समुदायापर्यंत त्याला जी माहिती किंवा संदेश द्यायचा आहे तो पोहोचारच नाही. जनसंवाद साधताना शब्दांचा उच्चार नक्कीच स्पष्ट असावा. आवाजातील चढ उतार: एखाद्या चित्रकारानं त्याच्या चित्रात केवळ एकाच रंगाचा वापर केला तर ते चित्र आपल्याला आवडणार नाही. त्याचप्रमाण आपण सलग एकाच आवाजात बोलत राहू आणि कुठेही चढ- उतार ठेवले नाहीत तर मात्र ते खूपच कृत्रीम वाटेल. एखादा रोबो बोलत आहे असं वाटेल. आवाजातील चढ-उतार हे अनेकदा भावना दर्शवतात. आवश्यक असेल त्याठिकाणी आवाजात भावनिक स्वर असल्यास संवाद अधिक प्रभावी होऊ शकतो. त्याचसोबत खूपच मोठ्या आवाजात बोलणं किंवा खूप कमी आवाजात बोलणं यामुळे देखील जनसंवादावर उलट परिणाम होऊ शकतो. जनसंवाद हा विशेषतः मोठ्या जनसमुदायापर्यंत होत असतो. त्यामुळे आवाज मोठा व कणखर असणं फार महत्त्वाचं आहेच पण उत्तम जनसंवादक कधीही अतिरिक्त आवाज वाढवणार नाही व सर्वांना आवाज ऐकू जातो आहे याची दखल नक्की घेईल. Quality structure of Public speaking