Skills required for Public speaking

Skills required for Public speaking

views

08:09
आपल्याला बाहेरगावी जाण्याचा प्लान बनवायचा आहे. तर सर्वात आधी आपण काय ठरवतो? कोणते कपडे घालायचे, बसनं जायचं कि ट्रेननं, नेताना सोबत काय काय न्यायचं, हे ठरवतो? की बाहेर जाण्याचा विचार येताच आपण सर्वात आधी कुठे जायचं हे ठरवतो? अर्थात, कुठं जायचं आहे ते ठिकाण आपण सर्वात आधी ठरवतो. याचप्रमाणं, जनसंवाद साधताना आपल्याला कसं बोलायचं आहे इथून सुरुवात न करता आपल्याला नेमकं काय बोलायचं आहे हे सर्वात आधी ठरवावं. यामुळे मुख्यत्त्वे, जनसंवादाचा हेतू स्पष्ट होतो. त्यानंतर आपल्यासमोरचा श्रोतृवर्ग, प्रेक्षक कुठल्या वर्गातून येत आहे, त्याचा वयोगट काय आहे, स्त्रिया आहेत की पुरुष आहेत, हे पहावं. या जनसंवादानंतर प्रेक्षकांमध्ये कुठले बदल होणं, अपेक्षित आहे हेसुद्धा ठरवणं तितकंच महत्त्वाचं आहे. माझी मुलाखत होणार आहे, तर मला जनसंवाद साधलाच पाहिजे, मला कॉलेजमधील संमेलनात बोलायचं आहे किंवा मला ऑफिसमध्ये प्रेझेन्टेशन द्यायचंच आहे -असा विचार करून जनसंवादासाठी तयार होऊ नये. भाषण लिहून काढायचं आणि थेट वाचून दाखवयाचं हेसुद्धा टाळलं पाहिजे. यामुळं संवाद फारच कृत्रीम वाटेल.