Team & Teamwork Go Back Team & Teamwork views 07:23 टीम म्हटलं की सगळ्यात पहिलं काय आठवतं....? नक्कीच क्रिकेट टीम. किंवा कोणत्याही खेळाची टीम. आपण नेहमी ऐकत असतो, की भारताच्या टीमने केलेली कामगिरी वगैरे वगैरे. तर आता आपण या व्हिडीओमधून टीम आणि टीमवर्क या संकल्पना समजून घेणार आहोत. आपण टीमची संकल्पना समजून घेतल्यास ओघाने टीमवर्क म्हणजे नेमकं काय, हेही समजेल. मराठीमध्ये टीमला संघ आणि टीमवर्कला सांघिक कार्य असं म्हटलं जातं. टीमवर्क होण्यासाठी मुळात आधी टीम असली पाहिजे. टीमची सर्वसामान्य व्याख्या समजून घेऊ. म्हणजे किमान तीनपेक्षा अधिक व्यक्तींचा समूह एकत्र येऊन काम करतो, तेव्हा एक टीम तयार होते. लक्षात घ्या,आपण एका समूहास टीम म्हणजेच संघ म्हणत आहोत. याचाच अर्थ समूह म्हणजे संघ नाही. या दोन्ही संकल्पना जरी समान वाटल्या तरी त्या समान नाहीत हे यातून स्पष्ट होते. टीममधील सर्व सदस्य हे एकाच प्रकल्पावर काम करत असतात. त्यांची काम करण्याची पद्धत समान असते. आपण टीमची व्याख्या अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ. Team & Teamwork