Importance of Teamwork

Importance of Teamwork

views

05:24
सोशल मिडीयावर फिरणारा हा प्रेरक संदेश तुम्ही नक्कीच ऐकला किंवा वाचला असेल. यात एकत्र काम केल्यानं सर्वांचाच फायदा होतो, असं म्हटलं आहे. थोडक्यात, टीममध्ये काम करण्याचे काही खास आणि विशिष्ट फायदे आहेत. एकंदर कामासाठी आणि व्यक्तिगत प्रगतीसाठी त्याचं महत्त्व आहे. ते नेमके काय आहेत हे पण इथे पाहूया. आपण एक प्रकल्प उदाहरणादाखल घेऊ. एका कंपनीला त्यांचे एक नवीन उत्पादन बाजारात आणायचं आहे. हा प्रकल्प आहे. या प्रकल्पावर अ ही व्यक्ती स्वतंत्रपणे काम करणार आहे. त्याने काम करायला सुरुवात केली. त्याने स्वतंत्रपणे एक्टीव्हिटी प्लान तयार केला. इतर आवश्यक संसाधनं किंवा इतर सेवा तो बाहेरून उपलब्ध करून घेणार आहे. सर्व कल्पना त्यानेच स्वतःच तयार केल्या आहेत. अ व्यक्तीने प्रोजेक्ट व्यवस्थित पार पाडला. काम सुरु केल्यापासून त्याला अनेकदा वेगवगेळ्या अडचणी आल्या. काही वेळेस त्याला नैराश्यही आलं होतं. पण त्याने हे काम तीन महिन्यांत पूर्ण केलं. काम पूर्ण झाल्यानंतर अ स्वतः फार थकलेला होता आणि कामाच्या ताणामुळे त्रस्त होता.