Skills required for Teamwork Go Back Skills required for Teamwork views 04:57 एकापेक्षा अधिक व्यक्तींचा समूह जेव्हा समान ध्येयासाठी काम करत असतो, तेव्हा तो संघ असतो. संघ म्हणजेच टीममधील सदस्य एकत्रिपणे किंवा स्वतंत्रपणे ज्या काही क्रिया प्रतिक्रिया करत असतात त्यास आपण टीमवर्क असं म्हणतो. टीमचे ठरलेलं ध्येय पूर्ण झालं की टीमला यश मिळालं असं म्हणता येऊ शकतं. टीममधील सदस्यांवर टीमचं यश अवलंबून असतं, असं म्हटल्यास ते चुकीचं होणार नाही. जेव्हा टीममधील सदस्य आपापल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडतात, तेव्हाच हे शक्य होतं. म्हणूनच टीममध्ये काम करण्यासाठी काही विशिष्ट कौशल्यांची गरज असते. ती कौशल्य कोणती आणि त्याने टीमवर्कला कसा फायदा होतो हे समजून घेऊ. उत्तम श्रोता: टीममधील सर्व सदस्यांना सर्व सूचना समजावून सांगणं, हे संघप्रमुखाचं काम असतं. संघप्रमुखास इंग्रजीत टीमलीडर असं म्हणतात. टीमलीडरने सदस्यांना जबाबदारी वाटून देणं अपेक्षित असतं. त्याने काम उत्तम प्रकारे समजावलं तर पाहिजेच. पण आधी सदस्यांचं म्हणणं समजून घेणं, त्यांच्या समस्या ऐकणं, काही शंका असतील, तर त्या ऐकणं यासाठी टीमलीडर आणि सदस्यांकडे ऐकण्याची क्षमता असणं फार महत्त्वाचं असतं. यास आपण उत्तम श्रोता म्हणजेच एक्टीव्ह लिसनिंग असं म्हणतो. एकमेकांचे प्रश्न, समस्या, सूचना व्यवस्थित ऐकून समजल्या नाहीत, तर जबाबदारी व्यवस्थित पार पडणार नाही. अर्थात, योग्य तो परिणाम साधला जाणार नाही. Skills required for Teamwork