भारतीय उपखंड आणि इतिहास Go Back इतिहासाची घडण आणि वैशिष्ट्ये भाग 1 views 3:49 इतिहासाची घडण आणि वैशिष्ट्ये : इतिहासाचा अभ्यास करताना आपल्याला एखाद्या प्रदेशाच्या भौगोलिक गोष्टींचा विचार करावा लागतो. भारतीय उपखंड व त्याचा इतिहास यांची माहिती आज आपण पाहणार आहोत. मानव ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणच्या त्याच्या भोवतालच्या परिसराचा त्याच्याशी जवळचा संबंध असतो. इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी होय. इतिहास म्हणजे भूतकाळातील घटनांची नोंद व अभ्यास. इतिहास म्हणजे एका युगातील दखल घेता येणाऱ्या घटनांची दुसऱ्या युगाने केलेली नोंद होय.' इतिहास म्हणजे मानवजातीच्या जीवनप्रवाहाचा अभ्यास असेही म्हणता येते. इतिहासाचे प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक असे कालखंड असू शकतात. इतिहासाच्या कोणत्याही कालखंडाचा अभ्यास म्हणजे त्या कालखंडाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक , प्रशासकीय, सांस्कृतिक, धार्मिक बाजूंचा अभ्यास असतो. या शिवाय या सर्वांचा एकमेकांशी असलेला संबंध आणि परिणाम यांच्या अभ्यासाचाही अंतर्भाव इतिहासात होतो.कोणताही इतिहास समजण्यासाठी आपल्याला पुढील चार प्रमुख गोष्टींचा आधार घ्यावा लागतो. म्हणूनच त्यांना इतिहासाचे आधारस्तंभ असे म्हणतात. स्थल, काल, व्यक्ती, आणि समाज हेच इतिहासाचे चार आधारस्तंभ. कारण कोणतीही घटना एखाद्या विशिष्ट ठिकाणी , विशिष्ट काळीच घडलेली असते. त्या घटनेशी काही व्यक्तींचा आणि त्यांच्या समाजाचा संबंध असतो. इतिहासाची घडण आणि वैशिष्ट्ये भाग 1 इतिहासाची घडण आणि वैशिष्ट्ये भाग 2 भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये भाग १ सिंधू – गंगा – ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये भाग 2 समुद्रातील बेटे