चला वृत्ते वापरुयात

प्रस्तावना

views

3:34
नकाशामुळे आपल्याला वेगवेगळे प्रदेश, नद्या, रस्ते, पर्वत, मैदाने यांचा सखोल अभ्यास करता येतो. पृथ्वी गोल आहे आणि नकाशा तर सपाट कागदावर काढलेला असतो हे कसे काय? असे तुम्हाला वाटू शकते. पण नकाशे वृत्तजाळीच्या सहाय्याने काढले जातात. वृत्तजाळी किंवा वृत्ते म्हणजे काय आणि त्यांचा वापर कसा होतो, हा आहे पृथ्वीगोल. त्यावर तुम्हाला उभ्या आणि आडव्या रेषा दिसताहेत का? उभ्या रेषांना रेखांश किंवा रेखावृत्ते म्हणतात. आणि आडव्या रेषांना अक्षांश किंवा अक्षवृत्ते म्हणतात. पृथ्वीच्या मध्यातून जी रेषा जाते तिला विषुववृत्त म्हणतात. या विषुववृत्तामुळे पृथ्वीचे दोन भागांत विभाजन झाले आहे. विषुववृत्ताच्या वरील भागाला उत्तर गोलार्ध आणि खालील भागाला दक्षिण गोलार्ध असं म्हणतात.