प्राचीन भारत आणि जग

भारत आणि पश्चिमेकडील देश-भाग 1

views

3:24
भारत आणि पश्चिमेकडील देश (भाग 1 ) :- मुलांनो, आपण भारतातील वेगवेगळ्या प्राचीन संस्कृतींविषयी माहिती घेतली. उदा. :- हडप्पा संस्कृती, वैदिक संस्कृती. तसंच भारतातील विविध प्राचीन राज्ये, त्यांचे राज्यकर्ते, त्यांचे धार्मिक धोरण तसेच त्यांचे इतर देशांशी असणारे व्यापारी संबंध आणि त्या व्यापारी संबंधातून संस्कृतीची झालेली देवाण – घेवाण आपण पाहिली. आज आपण प्राचीन भारताचे जगातील इतर देशांशी कशा प्रकारचे संबंध होते त्याची माहिती घेणार आहोत.प्राचीन संस्कृतींमधील भारतीय संस्कृती म्हणजे हडप्पा संस्कृती होय. या संस्कृतीतील लोकांनी भारतीय उपखंडाच्या पश्चिमेला असणाऱ्या देशांशी व्यापारी संबंध निर्माण केले होते. म्हणजेच भारतातील वस्तू त्यांच्या देशात व त्यांच्या देशांतील वस्तू भारतात आणल्या जात होत्या. उदा. :- रेशीम, मसाल्याचे पदार्थ, कापड, मातीची नक्षीकाम केलेली भांडी अशा प्रकारच्या वस्तूंची निर्यात केली जाई. म्हणजेच हडप्पा संस्कृतीपासूनच भारताची इतर देशांशी आर्थिक व सांस्कृतिक देवाण – घेवाण सुरु होती. तर सांस्कृतिक देवाणघेवाणीमध्ये चालीरीती,परंपरा, विविध कला, भाषा, आहार, वेशभूषा यांचा समावेश होतो. भारतात उगम पावलेल्या बौद्ध धर्माचा प्रसार अफगाणिस्तान आणि मध्य आशियातील अनेक देशांमध्ये झाला होता. ज्यावेळी इराणी लोकांचे साम्राज्य भारतात होते, त्यावेळेसही भारताचा पश्चिमेकडील जगाशी संपर्क वाढला होता. याच काळात ग्रीक इतिहासकारांची भारताबाबत माहिती मिळविण्याची उत्कंठा वाढीस लागली. त्यांनी भारताबद्दल केलेल्या लिखाणातून पश्चिमेकडील लोकांना भारताची ओळख झाली.