प्राचीन भारत :- सांस्कृतिक Go Back प्रस्तावना views 3:2 आज आपण प्राचीन भारतातील संस्कृती विषयीची माहिती घेणार आहोत. म्हणजेच प्राचीन भारताची सांस्कृतिक माहिती घेणार आहोत. यासाठी आपण संस्कृती म्हणजे काय ? हे आधी जाणून घेऊ.संस्कृती मध्ये ज्ञान, धर्म, श्रद्धा , कला, नैतिकता, कायदे (बंधने), परंपरा या सर्व गोष्टींचा समावेश होतो. मनुष्य समाजाचा एक घटक म्हणून हे सर्व शिकत असतो, आचरणात आणत असतो त्याला संस्कृती म्हणतात. या सर्वांचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत. प्राचीन भारतात साहित्य निर्मितीची परंपरा अखंड होती. साहित्य म्हणजे कोणत्याही प्रकारचे लिहून ठेवलेले साहित्य होय. उदा. ग्रंथ, नाटक, कविता, कादंबरी यांचा साहित्यात समावेश होतो. प्राचीन भारतात संस्कृत, अर्धमागधी, पाली आणि तामिळ भाषांतून ही साहित्यनिर्मिती झाली होती.यातील एक महत्त्वाचा साहित्य प्रकार आहे. तो म्हणजे संघम साहित्य होय. प्रथम आपण या साहित्याची माहिती घेऊ. संघम या शब्दावरूनच आपल्या लक्षात येते की संघम म्हणजे संघ (team) होय. तर हा कोणाचा संघ होता? तर हा विद्वान साहित्यिकांचा संघ होता. त्यांची सभा भरत असे त्याला संघम म्हणत. अनेक विद्वान साहित्यिक आपण लिहिलेले साहित्य म्हणजे कथा, नाटक, महाकाव्य या ठिकाणी जमा करीत. अशा संकलित झालेल्या साहित्याला ‘संघम साहित्य’ म्हणत. प्रस्तावना धार्मिक साहित्य व्याकरणग्रंथ लोकजीवन विज्ञान शिक्षणाची केंद्रे वलभी