संविधानाची वैशिष्ट्ये

केंद्रशासित प्रदेश/ संघशासित प्रदेश

views

4:03
आता आपण पाहूया की आपल्या देशाची विभागणी कशी झाली आहे. भारतामध्ये १ संघशासन, २९ राज्यशासने आहेत. तसेच एकूण ७ संघशासित प्रदेश आहेत. नवी दिल्ली, दीव - दमण, पुदुच्चेरी, चंदीगढ़, दादरा - नगर हवेली, अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप हे प्रदेश संघशासित आहेत. तिथे केंद्र किंवा संघशासन राज्य कारभार पाहत असते. त्यांना संघशासित प्रदेश असे म्हणतात. आपण जी घटक राज्ये पाहिली त्या प्रत्येक घटक राज्याचे स्वत: चे शासन आहे. त्याला राज्यशासन असे म्हणतात. प्रत्येक राज्याचा राज्यकारभार हे राज्यशासन पहात असते.प्रत्येक घटक राज्याची स्वत:ची राजधानी असते. त्यातील आपल्या नेहमीच्या परिचयातील नसलेली काही ईशान्येकडील राज्ये व त्यांच्या राजधानीची शहरे आपण पाहू. १) अरुणाचल प्रदेशाची राजधानी आहे इटानगर २) आसामची – दिसपूर ३) मणिपूरची - इंफाळ ४) मेघालयची – शिलॉंग ५) मिझोरामची –ऐजॉल ६) त्रिपुराची – आगरताळा आणि ७) नागालँडची – कोहिमा आहे. ही राज्ये भारताच्या ईशान्य कोपऱ्यात वसलेली आहेत. यांचा उल्लेख Seven Sisters असाही केला जातो.