महायुदधोत्तर राजकीय घडामोडी Go Back प्रस्तावना views 4:30 भारताचे जगातील इतर देशांशी असणारे संबंध पाहाणार आहोत. भूगोलाचा अभ्यास करून आपणास जगातील भौगोलिक माहिती समजली, तर इतिहासाचा अभ्यास करून ऐतिहासिक घडामोडींविषयी माहिती मिळाली. आता आपण राज्यशास्त्राच्या अभ्यासातून भारताचे जगाशी असणारे संबंध आणि महत्त्वाच्या जागतिक समस्या जाणून घेणार आहोत. मुलांनो मानव हा समाजप्रिय प्राणी आहे. त्याला समाजात राहायला आवडते. कारण आपल्या सर्व प्रकारच्या गरजांसाठी तो इतरांवर अवलंबून असतो. त्याच्या या अवलंबून असण्याला परस्परावलंबन असे म्हणतात. सर्वजण वेगवेगळ्या कारणांसाठी सोई-सुविधांसाठी समाजातील व्यक्ती, संस्था व संघटनांवर अवलंबून असतो. त्यासाठी परस्परांस मदत करणे खूप महत्त्वाचे असते. हे जसे व्यक्ती व समाजाबाबत आहे, तसेच ते विविध राष्ट्रांबाबतही खरे आहे. आपल्या भारत देशासारखी अनेक राष्ट्रे आहेत. ती स्वतंत्र व सार्वभौम असतात. त्यांच्यात नेहमीच काही देवाण –घेवाण होत असते. त्यांच्यात व्यवहार होत असतात. ही स्वतंत्र राज्ये परस्परांशी करारही करत असतात. या सर्व स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून एक व्यवस्था तयार होते. तिला ‘आंतरराष्ट्रीय व्यवस्था’ म्हणतात. प्रस्तावना पार्श्वभूमी पहिले महायुद्ध भाग १ दुसरे महायुदध शीतयुदध जगाचे द्विध्रुवीकरण शस्त्रास्त्र स्पर्धा अलिप्ततावादी चळवळी शीतयुद्धाची अखेर शीतयुद्धानंतरचे जग