आम्ल, आम्लारी व क्षार

आम्लाची आम्लारिधर्मता व आम्लारींची आम्लधर्मता

views

03:45
आता आपण आम्लारिधर्मता व आम्लधर्मता म्हणजे काय ते पाहूया. आम्ल व आम्लारीचे वर्गीकरण त्यांच्या आम्लारिधर्मता व आम्लधर्मता यांच्या आधारेही करतातआम्लाच्या एका रेणूच्या विचरणाने जितके हायड्रोजन आयन (H+) मिळू शकतात, ती संख्या म्हणजे त्या आम्लाची आम्लारिधर्मता होय. आम्ल म्हणजे एका रेणूपासून मिळू शकणाऱ्या हायड्रोजन आयन H+ ची संख्या. आम्लारीच्या एका रेणूंच्या विचरणाने जितके हायड्रॉक्साइड आयन OH- –मिळू शकतात, ती संख्या म्हणजे आम्लारीची आम्लधर्मता होय. आम्लारी म्हणजे एका रेणूपासून मिळू शकणाऱ्या हायड्रॉक्साइड आयन OH – ची संख्या.एकआम्लारिधर्मता असणारे आम्ल :- हायड्रोक्लोरिक आम्ल HCL, नायट्रिक आम्ल HNO3द्वीआम्लारिधर्मता असणारे आम्ल :-सल्फ्युरिक असिड H2SO4, कार्बोनिक आम्ल H2CO3 त्रिआम्लारिधर्मता असणारे आम्ल :- बोरिक आम्ल H3BO3, फॉस्फॉरिक आम्ल H3PO4एकआम्लता असणारी आम्लारी :- सोडियम हायड्रॉक्साइड NaOH, पोटॅशियम हायड्रॉक्साइड KOH, अमोनियम हायड्रॉक्साइड NH4OHद्विआम्लता असणारी आम्लारी :-कॅल्शियम हायड्रॉक्साइड Ca(OH)2, बेरीअम हायड्रॉक्साइड Ba(OH)2 त्रिआम्लता असणारी आम्लारी :-अल्युमिनिअम हायड्रॉक्साइड Al(OH)3, फेरीक हायड्रॉक्साइड Fe(OH)3