मानवाची वाटचाल

कुशल मानव ते आधुनिक मानव

views

4:28
‘एप’ या वानरापासून प्रगत किंवा उत्क्रांत होत जाऊन आदिमानव निर्माण झाला हे आपण मागील पाठात पाहिले आहे. आदि म्हणजे सुरवातीचा किंवा प्रारंभीचा. म्हणजेच वानरासारखा दिसणारा पहिला मानव होय. आता बघा, मानव उत्क्रांत झाला म्हणजे त्या ‘एप’ वानरामध्ये हळूहळू बदल होत जाऊन तो माणसासारखा बनला. त्याच मानवाचा पुढचा टप्पा म्हणजे त्याने आपल्या हातांचा वापर करून छोटी – छोटी हत्यारे तयार केली. म्हणून त्याला कुशल मानव म्हणतात. त्यातही पुढे अनेक बदल झाले. या बदलांची माहिती आपण आता घेणार आहोत. कुशल मानव म्हणजे हातांचा वापर करून चांगले काम करता येणारा मानव. ज्या मानवाने आपल्या हातांचा वापर कुशलतेने केला त्याला कुशल मानव म्हणतात. ‘लुई लिकी’ या शास्त्रज्ञाने या मानवाला ‘होमो हॅबिलिस असे नाव दिले. होमो हा शब्द ‘लॅटिन’ भाषेतील आहे. त्याचा अर्थ आहे: मानव/ माणूस. आणि हॅबिलिस या शब्दाचा अर्थ: हातांचा कुशलतेने वापर करणारा असा होतो. म्हणून त्याने ह्या मानवाला ‘होमो हॅबिलिस असे नाव दिले. हा मानव दोन पायांवर उभा राहू शकत होता. पण त्याच्या पाठीचा कणा पूर्ण ताठ नव्हता. त्याच्या कण्याला थोडासा बाक होता.