स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती

धातूचा वापर

views

4:31
शेती करण्याच्या तंत्राचा त्याला शोध लागल्यामुळे त्याने एका ठिकाणी स्थायिक/ राहून जीवन जगण्यासाठी प्रयत्न केले व त्यातूनच वस्ती/वसाहती स्थापन झाल्या. त्यातूनच गाव, नातेसंबंध, कुटुंब या गोष्टी निर्माण झाल्या. आज आपण या पाठात त्याच्या पुढील टप्पा पाहणार आहोत. चाकाचा शोध, धातूंचा वापर व नागरी संस्कृती यांविषयी माहिती आपण या पाठात घेणार आहोत. आपण वेगवेगळ्या धातूंपासून बनविलेल्या वस्तू वापरतो. उदा पाणी पिण्यासाठी स्टीलचा ग्लास, तांब्या वापरतो. स्टेनलीस स्टील हा धातूच आहे. त्याप्रमाणे पूर्वीचे लोक तांबे, पितळ या धातूंपासून बनविलेल्या वस्तू वापरत असत. हे सर्व अलीकडील काळातील झाले. प्राचीन काळी मानवाला कोणता धातू प्रथम सापडला असेल किंवा कोणत्या धातूचा वापर मानवाने प्रथम केला असेल? याबद्दल आपल्या मनात अनेक प्रश्न व कुतूहल निर्माण होते. आपण युरोपमधील संग्रहालयातील वस्तूंच्या साहाय्याने या प्रश्नांची उत्तरे मिळविण्याचा प्रयत्न करू. युरोप खंडातील एका संग्रहालयात पुरातन वस्तू या एकत्रित केलेल्या होत्या. त्यांचे वर्गीकरण थॉमसेन या अभ्यासकाने तीन गटात केले. त्याला ‘त्रियुग पध्दती’ असे नाव दिले. त्या वस्तूंची विभागणी त्याने तीन गटात केली. ती पुढीलप्रमाणे--- १) दगडाची हत्यारे – अश्मयुग, २) तांब्याची हत्यारे आणि इतर वस्तू – ताम्रयुग आणि ३) लोखंडाची हत्यारे आणि इतर वस्तू – लोहयुग