आधी - नंतर

प्रस्तावना आधी – नंतर

views

3:32
आधी – नंतर: मुलांनो, आज आपण आधी आणि नंतर म्हणजे काय ते शिकणार आहोत. चला तर मग, सुरु करूया. माझ्या डाव्या हातात कळी आहे. आणि उजव्या हातात फूल आहे. मग सांगा झाडाला आधी फूल आले असेल की कळी? वि: बाई आधी कळी येते आणि मग तिचे फूल होते. शि: बरोबर! तुम्ही सकाळी उठल्यावर प्रथम अंघोळ करता की नाश्ता? वि: बाई, आधी आम्ही अंघोळ करतो आणि मगच नाश्ता करतो. शि: बरं सांगा आधी १ येतो की २ येतात? वि: बाई आधी १ व नंतर २ येतात. शि: शाब्बास मुलांनो, अगदी बरोबर सांगितले. तर मग आता आपण आधी आणि नंतर याचा अधिक सराव करू. त्यासाठी मी तुम्हाला काही चित्रं दाखवणार आहे त्यात काय दिसते आहे ते सांगा. सांगा या चित्रात काय दिसते आहे? वि: आई भाकरी थापते आहे आणि भाजते आहे. शि: शाब्बास मुलांनो, मग सांगा आधी आईने भाकरी थापली की भाजली? वि: बाई, आईने आधी भाकरी थापली आणि नंतर ती भाजली. शि: अगदी बरोबर! म्हणजे आता तुम्हाला आधी काय आणि नंतर काय हे नीट समजले आहे.