एक – अनेक

प्रस्तावना एक - अनेक

views

2:47
एक- अनेक: मुलांनो, आता आपण एक आणि अनेक म्हणजे काय ते शिकणार आहोत. चला तर मग, सुरू करूया. मी तुम्हांला काही वस्तू दाखवणार आहे, त्या वस्तूंचे नाव आणि त्या किती वस्तू आहेत, ते तुम्ही मला सांगायचे आहे.). शि: सांगा बरं माझ्या दोन्ही हातांत काय आहे? वि : बाई, तुमच्या एका हातात डस्टर आणि दुसऱ्या हातात खडू आहेत. शि : अगदी बरोबर, यात डस्टर किती आहेत आणि खडू किती आहेत? वि: बाई डस्टर एक आहे. आणि खूप खडू आहेत. शि : बरोबर माझ्या हातात खूप खडू आहेत म्हणजेच अनेक खडू आहेत. कळलं? शि : मुलांनो सांगा या पहिल्या चित्रात काय आहे? वि : बाई, या चित्रात ब्रश आहेत. शि : बरोबर, यातील पहिल्या चित्रांत एकच ब्रश दाखवला आहे. आणि दुसऱ्या चित्रांत एकापेक्षा जास्त म्हणजेच अनेक ब्रश दाखवले आहेत. शि: शाब्बास! यावरून कळते की तुम्हाला एक आणि अनेक म्हणजे काय ते अगदी छान समजले आहे.