१ ची ओळख व लेखन

प्रस्तावना १ ची ओळख व लेखन

views

2:51
१ ची ओळख व लेखन: आज आपण ‘१’ ची ओळख व लेखन” शिकणार आहोत. चला तर मग सुरु करूया. मुलांनो, मला सांगा कुत्र्याला किती शेपट्या असतात? वि : बाई, कुत्र्याला एकच शेपूट असते. शि : अगदी बरोबर. मुलांनो पोपटाला किती चोची असतात? वि :-बाई, पोपटाला एकच चोच असते. शि : बरोबर! आता एक टाळी वाजवा पाहू. शि : शाब्बास, आता खाली दिलेल्या चौकोनात एक ढग काढा आणि तो पांढऱ्या रंगाने रंगवा. शि : शाब्बास, छान रंगवलात. यावरून तुम्हाला एक अंक म्हणजे नेमके किती हे छान समजले आहे. आता आपण ‘१’ अंक लिहायचा कसा ते शिकूया. शि: हे पहा इथे ठिपक्यांच्या मदतीने १ या अंकाचा आकार काढला आहे. प्रथम आपण या आकारावरून पेन्सिल फिरवून सराव करू. आणि नंतर स्वतंत्रपणे १ हा अंक काढू.