2 ची ओळख व लेखन Go Back प्रस्तावना 2 ची ओळख व लेखन views 3:07 २ ची ओळख व लेखन: शि: मुलांनो मागच्या वेळी आपण १ ची ओळख करून घेतली. आता आपण २ ह्या अंकाची ओळख करून घेणार आहोत. सांगा बरं आपल्या शरीरात असे कोणकोणते अवयव असतात जे २ च असतात? वि१: बाई, आपल्याला दोन हात असतात. वि२: आणि बाई पायपण दोन असतात. वि३: आणि डोळे पण दोन असतात. वि४: कानपण दोन असतात. वि५:नाक एकच असेत पण त्याला दोन भोकं असतात. शि: आता ही सर्व चित्रे पहा. आणि यातील कोणकोणती चित्रे २ आहेत ते सांगा. वि: बाई यामध्ये बाहुल्या २ आहेत. चॉकलेट २ आहेत. आणि आंबे २ आहेत. शि: अगदी बरोबर! आता आपण ‘२’ अंक लिहायचा कसा ते शिकूया. शि: हे पहा इथे ठिपक्यांच्या मदतीने २ या अंकाचा आकार काढला आहे. प्रथम आपण या आकारावरून पेन्सिल फिरवून सराव करू. आणि नंतर स्वतंत्रपणे २ हा अंक काढू. प्रस्तावना 2 ची ओळख व लेखन