३ ची ओळख व लेखन Go Back प्रस्तावना ३ ची ओळख व लेखन views 3:50 ३ ची ओळख व लेखन: शि: मुलांनो, आज आपण 3 ह्या अंकाची ओळख करून घेणार आहोत. मुलांनो मला सांगा बरं, पंख्याला किती पाती असतात?वि: बाई, पंख्याला तीन पाती असतात. शि: अगदी बरोबर! आता सांगा, रिक्षाला चाके किती असतात? वि: बाई, रिक्षाला तीन चाके असतात. एक पुढे आणि दोन मागे. शि: शाब्बास खूपच छान! मुलांनो, माझ्या मागे म्हणा...दोन आणि एक तीन वि: दोन आणि एक तीन शि: शाब्बास म्हणजे तुम्हाला सगळ्यांना आता तीन म्हणजे नेमके किती हे पक्के कळले आहे. चला तर मग आता आपण 3 अंकांचे लेखन कसे करायचे ते पाहू. या आधी तुम्ही १ आणि २ या अंकांचे लेखन कसे करायचे ते शिकलात आता आपण ३ या अंकाचे लेखन करू. शि: हे पहा इथे ठिपक्यांच्या मदतीने ३ या अंकाचा आकार काढला आहे. प्रथम आपण या आकारावरून पेन्सिल फिरवून सराव करू. आणि नंतर स्वतंत्रपणे ३ हा अंक काढू. प्रस्तावना ३ ची ओळख व लेखन