५ ची ओळख व लेखन Go Back प्रस्तावना ५ ची ओळख व लेखन views 3:49 ५. ची ओळख व लेखन : शि: मुलांनो, आज आपण ५ या अंकाची ओळख करून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. शि: सांगा पाहू आपल्या एका हाताला किती बोटे असतात? वि: बाई, आपल्या एका हाताला पाच बोटे असतात. शि: आणि एका पायाला किती बोटं असतात? वि: बाई, एका पायाला पाच बोटं असतात. शि: बरोबर. मुलांनो, चार नंतर कोणता अंक येतो? वि: बाई, चार नंतर पाच हा अंक येतो. शि: म्हणजेच चार आणि एक पाच होतात. म्हणून म्हणा चार आणि एक पाच. वि: चार आणि एक पाच. शि: शाब्बास म्हणजे तुम्हाला सगळ्यांना आता ५ म्हणजे नेमके किती हे पक्के कळले आहे. चला तर मग आता आपण ५ या अंकांचे लेखन कसे करायचे ते पाहू. शि: हे पहा इथे ठिपक्यांच्या मदतीने ५ या अंकाचा आकार काढला आहे. प्रथम आपण या आकारावरून पेन्सिल फिरवून सराव करू. आणि नंतर स्वतंत्रपणे ५ हा अंक काढू. प्रस्तावना ५ ची ओळख व लेखन