६ ची ओळख व लेखन

प्रस्तावना ६ ची ओळख व लेखन

views

3:59
६ ची ओळख व लेखन : आज आपण ६ या अंकाची ओळख व लेखन शिकणार आहोत. शि : मला सांगा, माझ्या हातात किती फुले आहेत? वि : १,२,३,४,५,६. बाई सहा फुले आहेत. शि : अगदी बरोबर मोजलीत. आता मला सांगा, या चित्रात किती चॉकलेटं दिसत आहेत? वि : बाई, सहा चॉकलेट आहेत. शि : शाब्बास, मुलांनो तुम्हांला माहीत आहे का ? पाच आणि एक किती? वि: नाही. शि : पाच आणि एक सहा मग म्हणा. माझ्या मागून पाच आणि एक सहा. वि : पाच आणि एक शि : मुलांनो आपण “६” ची ओळख करून घेतली. आता ‘६’ चे लेखन करूया. शि: हे पहा इथे ठिपक्यांच्या मदतीने ६ या अंकाचा आकार काढला आहे. प्रथम आपण या आकारावरून पेन्सिल फिरवून सराव करू. आणि नंतर स्वतंत्रपणे ६ हा अंक काढू. चला तर मग करा सुरवात. हा झाला तुमचा ६ या अंकाचा आकार तयार. असेच पुढील अंक गिरवा. शि: छान गिरवले सगळ्यांनी. आता मी ६ हा अंक ठिपक्यांच्या मदतीशिवाय तुम्हाला काढून दाखवते. आणि त्यानंतर तुम्हीही असाच अंक ठिपक्यांच्या मदतीशिवाय काढा.