९ ची ओळख व लेखन

प्रस्तावना ९ ची ओळख व लेखन

views

4:20
९ ची ओळख व लेखन : शि: आज आपण ९ या अंकांची ओळख व लेखन शिकणार आहोत. सांगा पाहू, माझ्या हातात किती चॉकलेटं आहेत?. वि: बाई, तुमच्याकडे एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ चॉकलेटं आहेत. शि: घड्याळात वाजले नऊ, बाबांनी आणला खाऊ. वि: हा...हा...हा.. शि: सांगा पाहू या चित्रात कोण दिसत आहेत? वि: बाई, या चित्रात गोगलगाई दिसत आहेत. शि: मग या किती गोगलगाई आहेत? वि: एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ. बाई, नऊ गोगलगाई आहेत. शि: आता आपण नऊ अंकांचे लेखन करू. त्याआधी म्हणा आठ आणि एक नऊ. वि: आठ आणि एक नऊ. शि: छान! आता हे पहा इथे ठिपक्यांच्या मदतीने ९ या अंकाचा आकार काढला आहे. प्रथम आपण या आकारावरून पेन्सिल फिरवून सराव करू. आणि नंतर स्वतंत्र ९ हा अंक काढू.